जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलाचा घात   

वडगावशेरी : चंदननगर-खराडी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून संतापलेल्या वडिलांनी तीन वर्षीय चिमुकल्याचा धारदार शस्त्राने खून केला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
माधव साधूराव टिकेटी (वय ३८ रा. चंदननगर, पुणे) असे अटक केलेल्या निर्दयीचे नाव असून हिंमत माधव टीकेटी (वय ३.५ वर्षे) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
 
या घटनेची चौकशी करताना पोलिसांना समजले, पती-पत्नी यांच्यात नेहमीच भांडण होत असत. यानंतर वडिलांनी रागाच्या भरात चक्क साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा धारदार शस्त्राने जीवे मारले. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली.पोलिसांनी सखोल चौकशी केली असता धक्कादायक सत्य उघडकीस आले. 
 
चंदननगर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र, वडिलांच्या वक्तव्यात तफावत दिसल्याने पोलिसांनी संशय घेत कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशी दरम्यान मुलाच्या वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. पती-पत्नीच्या वारंवार होणाऱ्या भांडणातून रागाच्या भरात त्यांनीच मुलाला संपवले असल्याचे उघड झाले. लहान वयाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. या बाबत दिलेल्या तक्रारीवरुन चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
 
ही कारवाई  पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला गुन्ह्याचा उकल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर, सहा पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस उपनिरीक्षक अजय असवले. राहुल कोळपे, पोह गोणे, गुरव, तांदळे, धुमाळ, उर्कोडे, कोळेकर, केदार, धाड, नाणेकर, पोशि भंडारी, शिंदे, जाधव, कोद्रे यांनी केली आहे.
 
पोलिसांनी वेगाने चक्र फिरवून तपास सुरु केला होता. अपहृत मुलाचे वडील टिकेटी याचेवर संशय वाटत होता. पोलिसांनी हद्दीतील सीसीटिव्ही तपासून व मुलाचे वडील माधव टिकेटी याचे मोबाईल नंबरचे सीडीआर काढले. पोलिसांनी सीसीटिव्हीची बारकाईने पाहणी करता माधव टिकेटी हे अपहृत मुलगा हिम्मत याला घेऊन जातानाचे फुटेज मिळाले. परंतु परत येताना त्याचे जवळ मुलगा नसल्याचे दिसले. तसेच माधव याने मुलाला घेऊन जाताना वाटेत एका दुकानातुन शस्त्र विकत घेतल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांचा माधववरचा संशय वाढला. त्याचेकडे पोलिसांनी कसून चौकशी केली व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करता त्यानेच मुलाला निर्जनस्थळी नेऊन, तेथे त्याचा गळा चिरुन त्याची निघृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.
 

Related Articles